आजकाल माणुसकी जणू शेवटची घटका मोजत आहे | We Should Look After Our Parents | लोकमत मराठी न्यूज़

2021-09-13 0

मुलाकडे वेळ नाही.
आजकाल माणुसकी जणू शेवटची घटका मोजत आहे. जे माता पिता आयुष्यातला प्रत्येक क्षण आपल्या मुलांसाठी मोजतात. रक्ताचा थेंब नि थेंब जाळतात. त्यांनाच वाऱ्यावर सोडण्याची जणू फॅशनच निर्माण होत चालली आहे. 6 महिन्यांपूर्वीची घटना जिथं आई चा मृत्यू होवून दीड वर्ष लोटला तरी मुलाला त्याची खबर नव्हती. जेव्हा तो भारतात म्हणजे मुंबईत परत आला तेव्हा त्याला आपल्या आईचा सापळा सापडला. आणि आज अशीच मानवतेला काळिमा फासणारी बातमी पुन्हा एकदा त्याच प्रगतीचे वारे वाहणाऱ्या अमेरिकेतून आली आहे. वडिलांच्या मृत्यूची बातमी दिल्याबद्दल धन्यवाद पण सध्या
माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे तुम्हीच परस्पर अंत्यसंस्कार करा अशा आशयाचा मेल धाडून अमेरिकेतल्या मुलाने जन्मदात्या पित्यावरील अंत्यसंकाराची जबाबदारी झटकली. फ्रान्सिस झेव्हियर्स कुटिन्हो(60) असे ह्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires